शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११


आपला देश सौदी अरेबिया सारखा हुकुमशाही किंवा चीन सारखा कम्युनिस्ट  नाही , आपला देश जगातील सर्वात मोठी लोक शाही आहे (अमेरिका देखील  आपली लोकशाहीच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही ) परंतु जातीय व्यवस्था हा भारतावर लागलेला मोठा डाग आहे ते पुसून टाकण्याची ताकत आता भावी पिढी कडे आली आहे त्यामुळे संधिसाधू राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत .त्यामुळे सर्व सामान्य जनतेशी निगडीत असलेला प्रश्न भ्रष्टाचार ह्या वरून लक्ष विकेंद्रित करण्यासाठी राजकारणी ,पत्रकार ,तथाकथित समाज सेवक ,धर्मगुरू ऐक होहून प्रयत्न करत आहेत .लोकशाही जर प्र्घाल्भ करायची असेल तर आर्थिक निकषावरच सर्व जातींना आरक्षण मिळायला हवे ,जातीवर आरक्षण जे चालू आहे त्या मधून जातीय व्यवस्था नस्थ होईल हे जे बाबा साहेबांनी स्वप्न बघितले होते ते आता साकार झाले आहे. आता प्रत्येक जाती धर्मातील लोक ,व्यापारी,पुढारी ,समाजसेवक, हातात हाथ मिळवून भ्रष्टाचार करून स्वतःचा स्वार्थ साधण्यात मग्न आहेत त्यांच्या दृस्ठीने सर्व सामान्य जनता गेली चुलीत .दोष आपण वरील लोकांना न देता स्वतः आत्मपरीक्षण करावे हे लोक कुणी निवडले आहेत ,त्या मुले सर्वात मोठे दोषी आपण आहोत .आता भारतात फक्त दोनच जाती शिल्ल्खा  आहेत ,भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचार विरोधी कुणाला साथ द्यायची ते आपणच ठरवा (स्वतःचा स्वार्थ दूर ठेवून पुढील पिधींचा विचार करून जे बाबासाहेबांनी आणि शिवरायांनी केले ) हीच खरी वरील महा पुरुषांना मानवंदना ठरेल 

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

वर्तमान  पत्राचा  वाचक  असो  अथवा  टीवी  पाहणारा  दर्शक  किंवा  इंटरनेट  वरील  पोस्ट  वाचणारा  तथाकातीत   मेम्बर  सर्वच  जन  वाचताना  ,पाहताना ,कुठल्या  तरी  पक्षाचा ,जातीचा ,धर्माचा ,विचार्श्रेनीचा  चष्मा  वापरून  बघत  असतात.त्यामुळेच पत्रकार वाचकाला जे आवडेल ते लिहिण्याचा प्रयत्न करतो (कधी कधी स्वताचे मन मानत नसताना ). तसेच टीवी वरील अन्कर लोकांना जे अवढेल त्या पद्धतीने बातमीला दिशा देण्याचा प्रयत्न करत  असतो ,इंटरनेट वरील पोस्ट बाबतीत देखील मला तोच  अनुभव आला .
        राजकीय पक्षांच्या नेत्यांबाबत हि असेच घडते मतदार ज्या भावनिक मुद्द्यांना महत्व देतो (मूळ समस्या सोडून ) त्याचेच उदो उदो  करतात .कारण त्यांना मतदारांची मते हवी असतात .त्या मुले सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख इमानदार नेत्याला उमेदवारी देण्या ऐवजी जनतेची नाडी ज्यांना माहित आहे अश्याच उमेदवारांना पक्षाचे तिकीट  देते
         पोलिसांच्या बाबतीत हि असेच घडते ,स्वतःचे कुटुंभ वाऱ्यावर सोडून जनतेचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावयास गेल्यास भ्रष्टाचारी राजकीय कार्यकर्ते ,तथाकातीत समाज सेवक ,पत्रकार ,राजकीय नेते ,भ्रष्ट अधिकारी  त्यांच्यावर दबाव आणतात
         आपण वर्तमान पत्राचे वाचक ,टीवी  चे दर्शक ,इंटरनेट चे मेम्बर ह्या लोकांना शिव्या शाप देवून मोकळे होतो ,नाण्याची दुसरी बाजू न बघता .
           मी स्वतः संगणक,राजकीय,पत्रकारिता , शेत्रात माघील वीस वर्षापासून असून देखील हे टाळले आहे
माजी ग्रुप वासियांना नम्र विनंती आहे कि कोणतीही पोस्ट वाचताना त्यामधील मजकुरावर टीका टिप्पणी जरूर करावी परंतु करणार्याचे गाव ,जात, धर्म ,पक्ष न बगता  ,तसेच कुठलाही फोटो बघताना त्या मधील संदेश बघावा (चष्मा काढून बघावा  ) 

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

JANLOKPAL

पवार साहेभावरील हल्ला ऐक राजकीय षड्यंत्र :
पवार यांच्या जवळ एक शस्त्रधारी कसा जातो ?राजकीय पक्षाचे  अनेक कार्यकर्ते सुरक्षा विभागात आहेत त्यांना या हल्ला बाबत चांगली कल्पना पण होती हरविंदर सिंग याला या  कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबा पर्यंत पोहचवले हरविंदर सिंग याला शरद पवार साहेबांवर चाकू ने हल्ला करायचा होता हे प्राथमिक निरीक्षणात दिसून येते जेव्हा शरद पवार साहेबावर हल्ला होतो तेव्हा हरविंदर सिंग याला एक व्यक्ती ज्याने पांढरें शर्ट घातले आहे तो लोकांच्या मारा पासून वाचवतो ......तो माणूस शरद पवार यांच्यावरील हल्ल्या मध्ये सहभागी असावा असे दिसतो आणि तो आरोपीला चांगले ओळखत पण असावा ...
आरोपी ने काट दुंगा असे म्हणत असताना तेथील व्यक्ती हसतो कसा हे पण समजत नाहीआणि त्या युवकाला मदत कसे काय करतो हे पण समजणारे कोडे आहे त्याच्या वेशभूषे वरून तो कोणी अधिकारी असावा असे वाटते
शरद पवार यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित होता यात वरिष्ठ अधिकारी हि सामील असण्याची शक्यता आहे .शरद पवार हे पुरोगामी आहेत त्यामुळेच अनेक राजकीय पक्षांना  त्यांच्याविषयी प्रचंड चीड आहे ..........
सर्व  राजकीय  पक्षाचे  कार्यकर्ते  मा शरद  पवार  साहेबावरी  झालेल्या   हल्ल्याचा  निषेध  करण्या  ऐवजी  
अन्नाच्या  वक्तव्याचा  निषेध  करून  स्वतःची  राजकीय  पोळी  भाजून  घेत  आहेत .  
भ्रष्टाचार  विरोधी  सक्षम  जन लोकपाल    बिलाच्या  मुद्दावरून  लक्ष  वळविण्या  साठी  हे  केलेले  षड्यंत्र   आहे  .जन लोकपाल   बिल  हे  जनतेच्या  प्रश्नाशी  निगडीत  आहे  त्यावरून  लक्ष  हटवून  भावनिक  मुद्दे   काढून  संसदेचे  कामकाज  कसे  ठप्प  करता  येईल  ह्या  साठी  केलेला  हा  उपद्व्याप  आहे. .संसदेत 
 जनतेच्या  प्रश्नाशी  निगडीत  जन लोकपाल वर     चर्चा  होणे  अपेक्षित  असताना  अश्या  निरर्थक  भावनिक 
 मुद्द्यावर  गोधळ  घालून लोकपाल     बिल कसे  टाळता  येईल  अथवा  ते  स्वतःच्या  सोयीसाठी  कसे  
तकलादू  बनविता  येईल  ह्या  साठी  काही  भ्रष्टाचारी  नेते  प्रयत्न रथ   आहेत .

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

sachin tendulkar

सचिन  तेंडूलकर  आणि  विनोद  कांबळी  हि  जोडी   क्रिकेटची  माहिती   असणारे  कोण  ओळखत  नाही  , ज्यांना  क्रिकेट  तंत्रीक्द्रीस्त्या  कळते  ते  सांगू  शकतात  कि  विनोद  कांबळी  श्रेष्ट  का  सचिन  तेंडूलकर  ?शालेय क्रिकेट मधील रेकोर्ड बघितले तर विनोद सरस ठरतो ,सामने जिंकून देणारा खेळाडू म्हणून रेकोर्ड तपासले तरी काम्बालीच श्रेष्ट ठरतो ,तरी पण सचिन ची व्यावसाईक कामगिरी डोळे दिपवणारी आहे .सचिन मुलेच भारतीय क्रिकेट बोर्डाला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ख्याती प्राप्त झाली आहे ,सचिन मुलेच अनेक लायकी नसलेल्या वस्तूंची विक्री वाढली आहे ,आणि विनोद ने हे मान्य केले पाहिजे कि ह्या तुलनेत तो सचिन पेक्षा उंचीने आणि बुद्धीने तसेच राजकीय दृष्टीने हि लहान आहे .हा विषय आज ह्या मुले काढण्यात येत आहे कारण विनोद काम्बलीने क्रिकेट सन्यास घेतल्यानंतर खूप वर्षानंतर काळ परवाच माच फ़िक्षिन्ग विरुद्ध विधान केले आहे ते खरे आहे किंवा खोटे हे कालच सांगेन परंतु उद्या होणार्या माच मध्ये सचिन आपल्या शतकाचे शतक करणार आहे असे मला आत्ताच सांगितले आहे ,हे जर शतक झाले तर समजावे कि सचिन हि ह्या गोरखा धंद्यात सामील आहे आणि जर नाही झाले तर समजावे कि भारत देशाचे नशीब खोठे कारण खेळात ध्यानचंद नंतर जादुई खेळाडू झालाच नाही . हॉकीचा जादुगार ध्यानचंद ला कमीत कमी भारत खनिज म्हणून तरी गौरवीत करण्यात यावे ह्याच प्रमाणे नाना पाटेकर हा कलाकार ऑस्कर पुरस्कार pasun vanchit  आहे

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

पेट्रोलचे  भाव आणि भ्रष्टाचाराचा  सरळ संबद्ध  आहे .पेट्रोल चे भाव कसे ठरतात ते पहिले समजून घेतले पाहिजे .पेट्रोलचे भाव = आंतरराष्ट्रीय   बाजारातील कच्चा तेलाचे भाव + उत्पादन खर्च + सरकारी कर ,ह्यातील सरकारी करांचा हिस्सा ५० % पेक्षा जास्त आहे .पूर्वी भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सबसिडी   देत असे,  आता  सबसिडी  हटवून सरकार सामान्य जनतेला मूर्ख बनवत आहे आणि विरोधी पक्ष देखील सर्व माहित असून गप्प आहे कारण त्यांचेही हित्साम्ब्ध  गुंतले आहेत .सरकारी तेल कंपन्यांना होणारा तोटा सरकारला येणाऱ्या करामधून भरावा लागत आहे ,त्यामुळे सरकारी तिजोरीत भ्रष्टाचारासाठी पैसा कमी पडत आहे .त्यामुळे हे सरकार चालवणारे भिकारी सामान्य  माणसाकडून म्हणजेच भिक्र्यांकडून भाव वाढीच्या माध्यमातून भिक मागत आहे .त्यांना माहित आहे हि जनता कुठलीही अपेक्षा न ठेवता दर निवडणुकीत त्यांच्या पदरात भिक टाकते .विरोधी पक्ष हि गप्प कारण त्यांना सत्तेचे डोहाळे  लागलेले आहेत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांनी वाढ केली असून मुंबईमध्ये आता एका लिटर पेट्रोलसाठी तब्बल ७१ रुपये मोजावे लागणार आहेत. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया दोन वर्षांच्या नीचांकावर गेल्याने खनिज तेलाच्या आयात महागली आहे. गुरुवारी एका डॉलरचा भाव ४७.५५ रुपये होता. महागड्या डॉलरमुळे सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढत असून तो कमी करण्यासाठी पेट्रोलच्या दरांमध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल आदी इंधनतेलाची विक्री करणा-या कंपन्या दर लिटरमागे २.६१ रुपयांचा तोटा सहन करत असून, निव्वळ पेट्रोल विकल्यामुळे त्यांचा दर दिवशी १५ कोटी रुपयांचा तोटा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑइलचा भाव आणि स्थानिक पातळीवरील भावांचा विचार केला तर, पेट्रोलचे भाव प्रति लिटर ३ रुपयांनी वाढवण्याची गरज होतीच असे एका सरकारी अधिका-याने सांगितले. इंडियन ऑइल कंपनी, भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांचा या आर्थिक वर्षात पेट्रोल विक्रीमध्ये झालेला तोटा तब्बल २,४५० कोटी रुपयांचा आहे. जर भाव वाढवले नसते तर पेट्रोल विक्रीमुळे या कंपन्यांचा तोटा २,८५० कोटी रुपयांनी या आर्थिक वर्षाअखेरीपर्यंत वाढला असता. यामुळे तल कंपन्यांना पेट्रोलचे भाव वाढवावे लागल्याचे अधिका-यांनी सांगितले.
पेट्रोलखेरीज या तीन कंपन्या कमी दरात डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व केरोसिन विकल्याने दर दिवशी २६३ कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहेत. डिझेल प्रति लिटर ६.०५ रुपये स्वस्त, केरोसिन प्रति लिटर २३.२५ रुपये स्वस्त तर स्वयंपाकाचा गॅस प्रति सिलिंडर (१४.२ किलो) २६७ रुपये स्वस्त विकण्यात येतो.
डॉलर ४८ रुपयांच्या आसपास घोटाळत असून ही पातळी यापूर्वी सप्टेंबर २००९ मध्ये गाठली गेली होती. रुपयाच्या प्रत्येक रुपयाच्या घसरणीने तेल कंपन्यांची वार्षिक तूट ९,००० कोटी रुपयांनी वाढते. यामुळे पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाचा गॅस या तिनही उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची गरज सरकारी अधिका-यांनी व्यक्त केली आहे.

मध्यरात्रीपासून अमलात येणारे पेट्रोलचे प्रतिलीटर नवे दर
मुंबई - ७१
नाशिक - ६९.८०
औरंगाबाद - ७१.८०
पुणे - ७४